रोटरी क्लब व डाॅ.गोरे हाँस्पीटल ने राबवलेला उपक्रम हा कौतुकास्पद - हर्षवर्धन पाटील 

रोटरी क्लब व डाॅ.गोरे हाँस्पीटल ने राबवलेला उपक्रम हा कौतुकास्पद - हर्षवर्धन पाटील 
Nirogi Balpan

इंदापूर ता.25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर मधील डाॅ.गोरे हाँस्पीटल व रोटरी क्लब आँफ इंदापूर यांनी संयुक्तीक रित्या राबवलेला निरोगी बालपण हा उपक्रम  कौतुकास्पद असून यामुळे अर्थिक संकटात सापडलेल्या कित्येक कुटूंबांना मदतीचा हात मिळाला असल्याचे मत राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.हर्षवर्धन पाटील यांनी अाज दि.25 आँगस्ट रोजी गोरे हाॅस्पीटल ला सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी इंदापूर नगरपरिषद गटनेते कैलास कदम, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,दूधगंगा दूध उत्पादक संघाचे चेअरमन मंगेश पाटील,रोटरी क्लब अाँफ इंदापूर अध्यक्ष अजिंक्य इजगुडे,माजी अध्यक्ष राकेश गाणबोटे,पुणे जिल्हा कुस्तिगीर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके,सचिव प्रशांत भिसे, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,माजी नगरसेवक हरिदास हराळे,डाॅ.उदय कुरुडकर,भिमाशंकर जाधव आदी मंडळी उपस्थित होती.

पाटील पुढे म्हणाले कि डाॅ.गोरे हाँस्पिटल व डाॅ.पंकज गोरे यांना मी सर्ववप्रथम धन्यवाद देतो. मागील दोन महिन्यापासून आपण 1340 बालकांची एकही रुपया फी न घेता मोफत तपासणी केली आहे. समाजाप्रती आपण यातून जी नैतिक जबाबदारी व कर्तव्य पार पाडली आहेत त्याचे कुठेही मोल होऊ शकत नाहीत. आज आपला मला अभिमान वाटतो.  कोरोनाची संकट मोठे आहे अद्याप त्यावर मात करता आलेली नाही. उलट परिस्थिती बिघडत चाललेली आहे. अशा परिस्थितीत गोरे हाॅस्पिटल व गोरे कुटूंब जनसेवेचा विढा उचलत सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यांचा आदर्श इतरांना घेण्याजोगा आहे. भविष्यात असेच चांगले काम करुन नांव उज्वल करा. माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतीलचं त्याहीपेक्षा कोणतीही मदद लागणल्यास अवश्य कळवा.आपणांस सर्वोतपरी मदत केली जाईल. 

यावेळी डाॅ.गोरे म्हणाले कि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही शहरासाठी धोक्याची असून आतातरी परिस्थिती ओळखून प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर,सोशल डिस्टंन्सिंग यांसह सॅनिटायझर व इतर प्रतिबंधकात्मक उपाय कटाक्षाने पाळले पाहीजेत. डाॅक्टर डे च्या निमित्ताने कोरोनामुळे कमकूवत झालेली अर्थिक स्थिती पाहून मी हाँस्पीटलच्या माध्यमातून रोटरीच्या सहकार्याने निरोगी बालपण हा उपक्रम चालू केला.त्यास आज जवळपास दोन महीने पूर्ण होत अाले. आजपर्यंत 1340 बालरुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला अाहे. एक डाँक्टर व देशाचा नागरिक म्हणून मला जे शक्य आहे ते मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करित आहे.सद्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता पुढील एक महीना हा उपक्रम आम्ही अखंड चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.