युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा - अंकिता हर्षवर्धन पाटील

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा - अंकिता हर्षवर्धन पाटील

टेंभुर्णी दि.१६ // टेंभुर्णी येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सतिश चांदगुडे व त्यांचे दोन चिरंजीव रत्नाराज व ऋतुराज या युवकांनी चालू केलेल्या ‘चायनीज हट ‘ चे उद्घाटन आज सोमवार दि.१६ नोव्हेंबर रोजी दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावरती संपन्न झाले.

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा व स्वतःचा व घरच्यांचा पाया मजबूत करून प्रगती करावी असे आवाहन यावेळी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने युवा उद्योजक उपस्थित होते.