ग्रामपंचायत पवारवाडी मध्ये महिला दिनी डोळे तपासणी शिबीर संपंन्न

ग्रामपंचायत पवारवाडी मध्ये महिला दिनी डोळे तपासणी शिबीर संपंन्न

इंदापूर 09 // ग्रामपंचायत पवारवाडी येथे महिला दिनाचे औचित्य साधून साईधाम प्रतिष्ठान बारामतीत व के के आय बुधराणी हाॅस्पिटल पुणे आणि अष्टविनायक आँप्टीकल्स बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीर मोतीबिंदू शस्त्रक्रीया व अलदपदरात चश्मे वाटप या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत पवारवाडी च्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महिलांसाठीच्या या विशेष कार्यक्रमाचे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य करणसिंह घोलप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सरपंच प्रशांत करे, उपसरपंच बबनराव वाबळे यांसह सर्व सदस्य व ग्रामस्त उपस्थित होते.

यावेळी साईधाम प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ.संगीता सूर्यकांत घाडगे यांनी महिला दिनानिमित्त संस्थेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या डोळे तपासणी शिबीराबाबत माहिती दिली.संस्थेचे सचिव सूर्यकांत घाडगे यांनी प्रास्ताविक केले.गावातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार सहसचिव ज्ञानेश घाडगे यांनी मानले.