ग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १७२ मुलींची खाती खोलून महिला दिन साजरा

ग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १७२ मुलींची खाती खोलून महिला दिन साजरा

इंदापूर 08// सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १७२ मुलींची खाती खोलून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी पोस्ट विभागाचे कर्मचारी दत्तात्रय पवार व मनोहर चव्हाण  उपस्थित होते.दरम्यान सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने १५० महिलांची मोफत आरोग्य तपासणी ही करण्यात आली,यामध्ये हिमोग्लोबीन,बी.पी.,शुगर या प्रमुख तपासण्या करण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच हनुमंत जमदाडे,सदस्य रविंद्र सरडे, सतीश चित्राव,गोकुळ कोकरे,माजी सरपंच सौ.मोहिनी सरडे, प्रशांत सरडे,गणपत जमदाडे,संजय जमदाडे,बळीराम जानकर, अभिमान कोळेकर,विजय शिद,आप्पा माने,नामदेव तोबरे,अमोल जमदाडे उपस्थित होते.

महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रियंका शिद,सौ.वैशाली शिद,श्रीमती सुप्रिया कोळेकर,सौ.गयाबाई तोबरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सरपंच सिताराम जानकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायत च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्या बद्दल डाॅ.सुवर्णा शिंदे,मयुरी लोहार,आयुब तांबोळी,वर्षा तरंगे, ताराबाई सिताफ, सर्व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी सेविका,दक्षता ढावरे,अलका ढावरे,छाया कदम,प्रियंका शिंदे,गंगूबाई सिताफ यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान विशेष करण्यात आला. महिलांना सक्षम बनविण्यासाठी १५ बचतगटांचा राजमाता अहिल्या महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आला असून संघाच्या अध्यक्षपदी सौ.सोनाली सिताराम जानकर ,सचिव पदी सौ.नकुसा हनुमंत जमदाडे, कोषाध्यक्षपदी सौ.सारिका रविंद्र सरडे, लिपिकापदी सौ.वर्षा नाना तरंगे याची निवड करण्यात आली आहे. बचतगट गावसमन्वयक म्हणून ज्योती ज्ञानेश्वर शिद यांची निवड करण्यात आली.

 
यावेळी बोलताना सरपंच सिताराम जानकर म्हणाले की,आज ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी,गावातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना,तसेच महिला बचतगट मेळावा,महिला संघ स्थापना करण्यात आली आहे.यापुढील काळातसुद्धा महिला सक्षमीकरणासाठी अतिशय प्रभावी पणे काम केले जाणार आहे. महिला बचत गटांसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.महिलांनी साऊ-जिजाऊ, रमाई,माता अहिल्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी.यावेळी आप्पासाहेब माने,सुप्रिया कोळेकर,दिपाली सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.बचतगटांना प्रशिक्षणा बाबत तालुका समन्वयक सौ.राणी ननवरे,अमर कदम,सुयोग सावंत, निलोफर पठाण यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले.आभारप्रदर्शन रविंद्र सरडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिकराव दंडेल,अतुल ढावरे यांनी प्रयत्न केले.