महिला दिन विशेष || इंदापूरच्या आइडियल नगराध्यक्षा अंकिता शहा

महिला दिन विशेष || इंदापूरच्या आइडियल नगराध्यक्षा अंकिता शहा

इंदापूर 07 // एक वर्षापूर्वी संपूर्ण विश्वावर कोरोना विषाणूने संक्रमण केले.कोरोना हा विषाणू अगदीच नवखा असल्याने वैद्यकीय क्षेत्रालाच एक आवाहन ठरले.संपूर्ण देश हा लाॅक डाउन झाला.तसा इंदापूर तालुका सुध्दा लाॅक डाउन झाला. इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी शहरवासीयांना मायेची पखाल पांघरुन सावध राहण्याचा इशारा दिला.

नारायणदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून कष्टकरी लोकांना अन्न पोहचवण्याचे काम केले.तसेच अनेक कुटुंबाला आधार दिला.इंदापूर शहरातील घराघरात जावून कोरोना पासून बचाव कसा करावा याचे प्रबोधन अविरद त्यांनी केले.एखाद्या घरात कोरोना बाधित रूग्ण आढळल्यास कसलीही तमा न बाळगता त्या ठिकाणी जावून त्या कुटुंबातील इतर सदस्यांना मृदू शब्दात त्या दिलासा देत होत्या. सीलबंध झालेल्या परिसरात घरोघरी जावून सुचना करायला त्या कधीही विसरत नव्हत्या. 

कोरोनाचा प्रकोप होत असताना त्यावेळी मुंबई,पुणे,सोलापूर अशा शहरांमध्ये कामाच्या निमित्ताने जी कुटुंबे स्थायिक झाली होती,ती मंडळी गावाकडे परतू लागली होती. परगावहून येणाऱ्या बाधित रुग्णांपासून आपल्या शहरवासीयांचा बचाव करण्यासाठी टेंभुर्णी नाका,अकलूज नाका,पुणे नाका,बारामती नाका या ठिकाणी तपासणी पथक तैनात केले.परगाव वरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करुन त्यांना इंदापूर शहरातील महाविद्यालयातील वसतिगृहात विलगीकरण कक्षात ठेवण्याची मोहिम राबवली.त्या वलगीकरण कक्षातील आवश्यक असणाऱ्या लोकांच्या भोजनाची उत्तम सोय ही केली. आपल्या कार्यकुशलतेने आणि सुक्ष्म नियोजनाने आपल्या कर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटवला.

योग्य नियोजनामुळे शहरातील मृत्यूदर ग्रामीण पेक्षा कमी राहिला.सप्टेंबर महिन्यामध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके  तयार करुन एका दिवसात सर्वेक्षण केले होते.या सर्व्हेक्षणाला भेट देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आले होते.अंकिता शहा यांची कार्यपद्धती पाहून आयुष प्रसाद यांनी गौरवोद्गार काढले होते.माझे कुटुंब माजी जबाबदारी ही मोहीम त्यांनी इंदापूर शहरात प्रभावीपणे राबवली.

या सर्व गोष्टी कोरोनाच्या काळात झाल्या असल्या तरीही नगरपरिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून आज अखेर इंदापूर शहर चकाचक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला.स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान राबवताना "आधि केले आणि मगं सांगितले" या उक्तीनुसार सफाई कामगारांबरोबर शहरातील वेगवेगळ्या भागातील कचऱ्याचे असलेले ढिगारे हटवले.यामुळेच इंदापूर नगरपरिषदेला सलग तीन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मानांकन मिळाले. इंदापूर नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेमध्ये अटल घनवन,आँक्सिजन पार्क तसेच शहरातील मार्गावरील दुभाजकामध्ये वृक्षारोपनाने हिरवळ फुलवली. त्यामुळे शहराच्या सुशोभिकरणात भर पडली.शहरातील कार्यालये,सार्वजनिक ठिकाणच्या अबोल भिंती बोलक्या केल्या. आता सध्या माझी वसुंधरा अभियान सुरु असून प्रदूषण कमी करण्यासाठी इंदापूर शहरात सायकल मार्ग तयार केला. हि सर्व कामे प्रत्यक्षदर्शी दिसणारी आहेत.इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावले.कर्मचाऱ्यांचे पगार निश्चित तारखेला होऊ लागले,त्यामुळे कर्मचारी सुखावले.संपूर्ण शहर माझे,कुटुंब माझी जबाबदारी हीच संकल्पना त्यांनी अंगीकारली……