१५ जुलै २०२१ पर्यंतचे सर्व राजकिय व सामाजिक गुन्हे मागे घ्या - मराठा क्रांती मोर्चाची प्रवीण दरेकरांकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी

१५ जुलै २०२१ पर्यंतचे सर्व राजकिय व सामाजिक गुन्हे मागे घ्या - मराठा क्रांती मोर्चाची प्रवीण दरेकरांकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी

इंदापूर || ३१ डिसें २०१९ पर्यंत चे सर्व राजकिय व सामाजीक गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाचा निणर्य झाला आहे.फडणवीस सरकारच्या काळात १० लाखापर्यंत नुकसान झालेले गुन्हे मागे घेतले होते,पण काही न्यायव्यवस्थेची प्रक्रिया बाकी होती. 

२ जुलै २०२१ रोजीच्या ठाकरे सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. तरी आपणांस विनंती आहे की १५ जुलै २०२१ पर्यंत सर्व राजकिय व सामाजीक गुन्हे मागे घेण्यात यावे.याबाबत आपण ठाकरे सरकारकडे पाठपुरावा करावा अशी लेखी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांकडे मराठा क्रांती मोर्चा इंदापूर च्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

याचसोबत मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत मराठा समाजास OBC च्या सर्व सवलती लागू करण्यात याव्यात.राज्य सरकारने नव्याने गठीत केलेल्य राज्य मागास आयोगात ५ सदस्य मराठा समाजाचे घेण्यात यावेत. आण्णासाहेब पाटील महामंडळास १००० कोटींची तरतुद करण्यात यावी अशा मागण्याही केल्या आहेत.

यावर पवनराजे घोगरे,अमरदिप काळकुटे,सचिन सावंत,तुषार काटे, प्रतिक घोगरे,प्रवीण पवार,काशिनाथ अनपट,सचिन जाधव, रणजित घोगरे,आकाश बोबडे यांच्या स्वाक्षरी आहेत.