मोतीबिंदू म्हणजे काय? जाणूयात डाॅ.उदय कुरुडकर यांकडून……

मोतीबिंदू म्हणजे काय? जाणूयात डाॅ.उदय कुरुडकर यांकडून……

इंदापूर 20 // मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी) धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

डाॅ.कुरुडकर दांपत्य हे नेत्रतज्ञ व शल्य चिकित्सक असून डाॅ.उदय कुरुडकर व डाॅ.भारती कुरुडकर यांचे शिक्षण एम.एस.(शल्य चिकित्सक)झाले आहे. ते गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ इंदापूर या ठिकाणी आपल्या श्री नेत्र रूग्णालयात रूग्णांना सेवा देत आहेत.ते असे म्हणतात की मोतीबिंदू आल्यावर नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे.रात्री गाडी चालवतांना समोरचा लाईट जास्त त्रासदायक होतो.डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणे. डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा गोल म्हणजे बाहुली.रंग फिक्कट दिसतात.सर्व काही अस्पष्ठ दिसते.प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश अतिप्रखर वाटतो.रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात.एका डोळ्याने दुहेरी दिसणे रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे चष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्रे सतत बदलणे आदी लक्षणे यात दिसून येतात.

मोतीबिंदूसाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.त्यामुळे मोतीबिंदू लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून काढून त्याऐवजी डोळयातच कायमचे भिंग बसवले जाते. मात्र औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही. तसेच उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळयावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण चांगला प्रतिबंधक उपाय आहे. 

प्रमुख कारणं
१. वाढत्या वयानुसार नैसर्गिक भिंगातील प्रथिनांमध्ये बदल होऊन ते अपारदर्शक होतात.
२. डोळ्यांना इजा झाल्यास.
३. डोळ्यांच्या इतर आजारांमुळे.
४. स्टेरॉइडसारखी औषधं दीर्घकाळ वापरल्यामुळे.
५. मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये मोतिबिंदू लवकर होतो.
६. काही रुग्णांना जन्मतः मोतिबिंदू असतो.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery)
४० वर्षे वय झाल्यावर प्रत्येक वर्षी डोळ्यांच्या डॉक्टर कडून डोळ्यांची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.मोतिबिंदू कोणत्याही औषधाने अथवा चष्मा वापरून कमी होत नाही. शस्त्रक्रिया हाच एकमेव कायमस्वरूपी उपचार आहे. यात अपारदर्शक भिंग काढून कृत्रिम भिंगारोपण केलं जातं. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.

मोतीबिंदूची जुनी शस्त्रक्रिया आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी मोतीबिंदू काढून चष्मा दिला जात होता. आता मोतीबिंदूच्या जागी नवीन कृत्रिम भिंग बसवले जाते. या भिंगाने चष्म्याची गरजच राहिली नाही. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.

साधी टाक्याची पध्दत (SICS

यात बुबुळाच्या परीघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी आता नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे कधीकधी 
टाके टाकावे लागतात. हे टाके जखम भरायला थोडे दिवस लागतात. ही पध्दत सर्वत्र प्रचलित आहे.  ही पध्दत खाजगी रुग्णालयातही खूप स्वस्त आहे. (अंदाजे खर्च 6000 ते 8000 रु.)

बिनटाक्याची 'फेको' पध्दत

यामध्ये छेद फक्त 2-3 मि.मी.चा असतो. यात एक सूक्ष्म प्रोब फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात व तो द्रवरुप करून शोषून घेतात. यामुळे मोतीबिंदू लहान छेदातून काढता येतो. मोकळया जागी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व आत ते उघडते. या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत. यात आता आणखी नवीन उपकरणे आली असल्याने छेद आणखी थोडा लहान झाला आहे. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. या शस्त्रक्रियेला जास्त खर्च येतो.(अंदाजे 10 हजार रुपये पासून पुढे) 

या शस्त्रक्रीयाव्दारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक नेत्रभिंग वापरून रूग्णाचा जवळचा व लांबचा चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी घालवता येऊ शकतो.यासाठी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फेको मशीन ( Alcon Centurion Vision System - Phaco Machine)तसेच अत्याधुनिक सर्वसुविंधायुक्त माॅड्युलर आँपरेशन थिएटर इंदापूर मधील श्री नेत्र रुग्णालयात उपलब्ध आहे.याबद्दल अधिकच्या सल्ल्यासाठी आपण श्री नेत्र रूग्णालयास संपर्क साधू शकता - 9272737363