उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांनी इंदापूरच्या सावित्रीच्या लेकींचे शिक्षण समिती मध्ये केले कौतुक

उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांनी इंदापूरच्या सावित्रीच्या लेकींचे शिक्षण समिती मध्ये केले कौतुक

पुणे || लाॅक डाउन कालावधीमध्ये दिनांक 17 मार्च 2020 पासून जिल्ह्यातील शाळा बंद होत्या त्या वेळी पहिल्या दिवसापासून पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभागाने विद्यार्थी शिक्षण खंड पडू नये म्हणून विविध ऑनलाइन चाचण्या, विद्यार्थी व शिक्षक स्पर्धा, व्हिडीओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आल्या.

तालुकास्तर व्हिडीओ निर्मिती साठी 38 महिला शिक्षकांचे गट तयार करण्यात आले व आज अखेर इयत्ता 1ली ते 4 थी चे 2500 व्हिडीओ अभ्यासक्रमा नुसार   तयार करण्यात आले. यासाठी indapur learn from home हा यु ट्युब (you tube )चॅनल तयार करण्यात आले.सदर चॅनल वरती व्हिडीओ  अपलोड करण्यात आले.त्यासाठी 8 तंत्रस्नेही शिकांची मदत घेतली.तसेच विद्यार्थी व शिक्षक यांची वेळोवेळी विविध स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले.

दि.3 जाने 2021 रोजी राज्य शासनाने महिला शिक्षण दिन घोषित केले.त्या पार्श्वभूमीवर सावित्रीच्या लेकी या पुस्तक रुपात सर्व उपक्रमाचे संकलन करून ते प्रकाशित करण्यात आले.सदर पुस्तकाचे वितरण आजच्या शिक्षण समिती बैठकीत सर्व सन्मानित सदस्य व अधिकारी यांना वितरण करण्यात आले.

इंदापूर learn from home या You tube चॅनल वर आज अखेर 1चलाख15 हजार पेक्षा जास्त दर्शक (views) मिळाले आहेत.2500 पेक्षा जास्त subscriber चॅनलला लाभले आहेत.तसेच सर्व व्हिडीओ व 26 चाचण्या व 26 अभ्यासक्रम  QR CODE स्वरूपात अभ्यासासाठी पुस्तकाच्या आतील मल पृष्ठ व मुख पृष्ठ वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदरच्या पुस्तकात 55 महिला शिक्षकांनी लॉक डाउन काळात शाळा बंद पण शिक्षण चालू या प्रेरणादायी कामगिरी केलेले आहेत त्या अनुभवाचे संकलन पुस्तक रुपात केलेले आहेत. याप्रसंगी सन्मानीय सदस्य,  शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सुनील कुऱ्हाडे साहेब, माध्यमिक सुनंदा वाखारे मॅडम, उपशिक्षणाधिकारी व 13 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.