सरडेवाडी गावातील लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद ; सरपंच सिताराम जानकर यांची माहिती

सरडेवाडी गावातील लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद ; सरपंच सिताराम जानकर यांची माहिती

इंदापूर || कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून बुधवारी दि.८ सप्टेंबर रोजी सरडेवाडी येथील अथर्व लाँन्स येथे लसीकरण शिबिर राबवण्यात आले.

या शिबिरात एकूण १५३ लसीचे डोस उपलब्ध झाले होते या वेळी गावातील नागरिकांच्या १२१ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या.त्यापैकी सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. शिवाय या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सरपंच सिताराम जानकर यांनी दिली.

यावेळी सरपंच सिताराम जानकर,उपसरपंच हनुमंत जमदाडे,रविंद्र सरडे,सतीश चित्राव,गोकुळ कोकरे,प्रियंका शिद,विजय शिद, वैशाली शिद,सुप्रिया कोळेकर,वैशाली कोळेकर,गयाबाई तोबरे, अलका कडाळे,ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होत्या. आरोग्य विभागाच्या डाॅ,सुवर्णा शिंदे,मयुरी लोहार,कामिनी सिताफ,वर्षा तरंगे,सविता मोरे यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले.राजेंद्र मदने यांनी डाटा एन्ट्रीचे संपूर्ण काम पाहिले.