वंचित बहुजन आघाडी इंदापूर ची नूतन कार्यकारणी जाहीर ; वाचा कोणाकडे काय पदभार

वंचित बहुजन आघाडी इंदापूर ची नूतन कार्यकारणी जाहीर ; वाचा कोणाकडे काय पदभार

इंदापूर ||  वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार शुक्रवारी दि.02 जुलै रोजी इंदापूर तालुका कार्यकारणी निवडीसाठी इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. 

पुणे जिल्हा सचिव हनुमंत कांबळे यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या बैठकीत  इंदापूर तालुका अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे,अनोज गायकवाड,बोधीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली.अमोल भोसले,शरद पवार यांची महासचिव निवड करण्यात आली.कोषाध्याक्ष राजेंद्र बंडगर , संघटक पंकज बनसोडे व तसेच इंदापूर शहाराध्य म्हणून अविनाश मखरे यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा सचिव हनुमंत कांबळे यांनी सांगितले.

यावेळी प्रसाद लोखंडे, पवन पवार, सागर लोंढे, अँड.संजय चंदनशिवे, विकास गायकवाड, लखन गायकवाड, प्रा.सतिश जगताप, अमोल भोसले, अतुल कांबळे, यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रमोद चव्हाण यांनी केले. आभार राहुल सोनवणे यांनी मानले.