राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत वडापूरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा प्रारंभ

राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत वडापूरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा प्रारंभ

इंदापूर || इंदापुर तालुक्यात १८ वर्षावरील लसीकरणाला  विविध ठिकाणी सुरवात झाली असून आज शुक्रवार दि.२५ जून रोजी वडापुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, गणेश चंणशिवे, दादासाहेब चंदणशिवे, दादासाहेब तोबरे, दयानंद चंदणशिवे, शिवाजी तरंगे व परिसरातील नागरिक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

१८ वर्षावरील  नागरिकांना पहिला डोस व ज्यांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोसची या लसीकरणातून देण्यात येणार आहे. वय वर्ष ४५ असणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील कोरोनाची दुसरी लाट शमली असली तरी ती पूर्ण हद्दपार झालेले नाही. तोच तिसरी लाट येणार की काय अशी परिस्थिती आता दिसू लागली आहे.विविध शास्त्रज्ञांकडून तसे भाकित देखील केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी गर्दी न करता केवळ महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडावे.स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी मास्कचा काटाक्षाणे वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले आहे.