ब्रेकींग || पळसदेव गावचे हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघेही जागीच ठार

ब्रेकींग || पळसदेव गावचे हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघेही जागीच ठार

इंदापूर || पुणे सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावर पळसदेव गावचे हद्दीत मोटारसायकल आणि टाटा टेंम्पो मध्ये भिषण अपघात झाला असून या अपघातात मोटार सायकल वरील दोघेही जागीच ठार झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज रविवार (दि.04) रोजी दुपारी दिड च्या सुमारास मौजे पळसदेव गावचे हद्दीत  सर्व्हिस रोडवरती हीरो होंडा डिलक्स मोटारसायकल (गाडी नंबरMH-12-DN-2791) दोघे जन दारुच्या नशेत प्रवास करित होते.प्रवासा दरम्यान पुणे कडून सोलापूर कडे भरधाव वेगात जात असताना समोरून येणाऱ्या टाटा टेम्पो ( वाहन क्रमांक MH-42-AQ-6006)यास समोरून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. यात मोटार सायकलवरील  मोटारसायकल चालक व मोटार सायकल वरती त्याच्या पाठीमागे बसलेला इसम या दोघांनाही गंभीर  दुखापत होऊन जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र डाळज चे पोलीस उपनिरिक्षक शंकर मुटेकर,सहाय्यक फौजदार विठ्ठल कदम,हवालदार दत्तात्रय मदणे,राजाभाऊ जगदाळे,पो.नाईक नवनाथ नलवडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.अपघातात ठार झालेल्या दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही.मोटार सायकल नंबरची ई चालान मशीनवरून तपासणी केली असता सदर मोटार सायकल बाबत कोणतीही माहिती मिळून आली नाही. मयताचे जवळील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये दारुची बॉटल, ग्लास आदी साहित्य मिळून आल्याचे पोलीसांनी सांगितले.

" दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी पळसदेवच्या हद्दीत झालेला हा अपघात पाहतात आपली गाडी थांबवली. परिस्थिती पाहिली मात्र दोघेही जागीच मयत झाल्याने पोलीस यंत्रणेच्या मदतीने दोन्ही मयत इसम यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवले."