रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांची महिला डॉक्टरसह दोन परिचारिकांना मारहाण

रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांची महिला डॉक्टरसह दोन परिचारिकांना मारहाण

इंदापूर || तुम्ही आमच्या वडिलांवर व्यवस्थित औषधोपचार करीत नाही असे म्हणून  रुग्णालयातील कोविड कक्षात घुसून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व दोन परिचारिका महिलांना मारहाण झाल्याची घटना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात शनिवारी 8 मे रोजी घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा अहोरात्र  कोरोणा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा व आरोग्य सेविकांचा सुरक्षिततेचा प्रश्न उपलब्ध झाला आहे.

यातील डॉक्टर व परिचारकांस मारहाण  करणाऱ्या  सुनील  चंद्रकांत रणखांबे, रवी चंद्रकांत रणखांबे राहणार पंचायत  समिती कॉलनी रुम नंबर ४ इंदापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत इंदापूर पोलीस ठाण्यात डॉक्टर श्वेता संभाजी कोडग( वय 23 वर्षे) राहणार आदित्य चिंतामणी रेसिडेन्सी जी 15 बिबेवाडी पुणे,(सध्या राहणार उपजिल्हा रुग्णालय कॉटर्स इंदापूर ) यांनी  फिर्याद दाखल केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर सेवा करीत असताना वार्ड क्रमांक तीन मध्ये नियमित कर्तव्य करीत असताना रुग्ण चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबे (वय 56 वर्षे)राहणार पंचायत समिती कॉलनी क्रमांक ४ इंदापूर  यांचे नातेवाईक सुनील  व रवी रणखांबे यांनी कोविडच्या वार्ड ३ मध्ये जबरदस्ती प्रवेश करून तुम्ही माझ्या वडिलांवर व्यवस्थित उपचार औषध उपचार करीत नाही म्हणून फिर्यादीचा हात पिरगाळुन डाव्या गालावर चापट मारली.  तसेच परिचारिका अंजली  बिभीषण  पवार, राहणार इंदापूर व सोमय्या सत्तार बागवान (राहणार अकलूज ता, माळशिरस ) यांना देखील हाताने मारहाण केली. अंजली पवार यांना गळ्या जवळ जखम केली आहे.तसेच शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन धमकी दिली व शेजारील औषधाचे नुकसान केले आहे.

पुढील तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे  प्रभारी  पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.एम. धनवे अधिक तपास करत आहेत.