मामाच्या मुलीसोबत त्याचे संबंध होते म्हणून धनाजीचा काटा काढला ; दोघांना अटक

मामाच्या मुलीसोबत त्याचे संबंध होते म्हणून धनाजीचा काटा काढला ; दोघांना अटक

सांगली || मामाच्या मुलीशी असणारे संबंध तोडले नाहीत, म्हणून 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडची गावात घडली आहे.धनाजी भागप्पा टेंगले असं 19 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी रात्री साडे आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यातील दरीबडची गावात हा प्रकार घडला. या हत्येमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.  घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी रातोरात दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी ही हत्या केल्याची कबुली दिल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

मयत धनाची टेंगले याचे आरोपी राजू लेंगरे याच्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याची राजूला माहिती होती.यातूनच राजू आणि धनाजी यांच्यात धुसफूस सुरु झाली. परंतु राजूचे संबंधित तरुणीसोबत लग्न करण्याची चर्चा घरातील नातेवाईकांमध्ये होती.आरोपी राजू लेंगरेने धनाजीला आपल्या मामाच्या मुलीचा नाद सोड, असा तगादा लावला होता, मात्र दोघांमधील प्रेमसंबंध कायम असल्याचा संशय आरोपी राजूला होता.

धनाजी टेंगळे याचा दूध वितरणाचा व्यावसाय आहे.गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध वितरित करण्यासाठी दरीबडची गावात आला होता. दररोज तो आठपर्यंत दूध वाटून घरी येत असतो. मात्र त्या दिवशी रात्री दहा-साडेदहा वाजले तरी तो घरी आलाच नाही, यामुळे घरातील वडील आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना दरीबडची कुलाळवाडी रस्त्यावर धनाजीचा मृतदेह आढळून आला.

यावेळी मयत धनाजीच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने गंभीर वार दिसून आले.घटनास्थळी दुधाची किटली आणि चप्पलही तिथेच पडलेली होती.जत पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.