हायवा आणि दुचाकीचा अपघात ; इंदापूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

हायवा आणि दुचाकीचा अपघात ; इंदापूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

दौंड 20 // पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावर पाटस घाटात हायवा ट्रक आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात इंदापूर तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नवनाथ दगडू जाधव वय 34,रा. निरनिमगाव. ता. इंदापुर  व तात्याराम जगन्नाथ राऊत  वय 34. रा. लाखेवाडी ता. इंदापूर असे या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नांवे आहेत.

सौ.महान्यूज लाइव्ह ने दिलेल्या वृत्तानुसार  नवनाथ जाधव व तात्याराम  राऊत  हे काही कामानिमित्त पाटसला गेले होते. काम आवरुन एम एच 13 यु 9714 या मोटारसायकल वरुन ते इंदापूरकडे निघाले होते.दि.19 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पाटस – कुरकुंभ घाटात हॅाटेल कांदबरी जवळ एम. एच 42 ए.क्यु. 1852 या समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या हायवा टिपरने दुभाजक तोडून मोटार सायकल ला जोरदार ठोस दिली.यात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटस पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.याबाबत अमित अरूण पवार रा. मोरेवस्ती,दौंड यांनी पाटस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  हायवा ट्रक चालकाविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.