रस्त्यावरून जाण्या येण्याच्या कारणावरुन मदनवाडी हद्दीत तिघाला मारहाण ; भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल

रस्त्यावरून जाण्या येण्याच्या कारणावरुन मदनवाडी हद्दीत तिघाला मारहाण ; भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल

इंदापूर || रस्त्यावरून जाण्या येण्याच्या कारणावरुन मदनवाडी गावचे हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर तिघांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यासह लोखंडी गजाने मारहान करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दि.16 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान घडली आहे.

किरण अजिनाथ शिंदे ,वय-38 रा.भोडणी ता.इंदापुर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी किरण सावंत,सुनिल सावंत,विजय चव्हाण (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा.मदनवाडी ता.इंदापुर यांविरूध्द भिगवण पोलिस ठाण्यात भा.द.वि.क 324,323,504,506,34 शनिवार दि.17 जुलै रोजी रात्री 09 चे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,की शुक्रवार दि.16 जुलै रोजी फिर्यादीचा पुतण्या आदित्य अशोक शिंदे यास सदरील आरोपी तु माझे घरासमोरील रस्त्याने जायचे नाही असे म्हणुन रस्त्यावरून जाण्या येण्याच्या कारणावरुन शिवविगाळ करू लागले व वाहनाची चावी काढून घेतली. दरम्यान फिर्यादी किरण अजिनाथ शिंदे व फिर्यादीचा भाऊ अशोक शिंदे हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.यावेळी वरील आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ अशोक शिंदे यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तर आरोपी सुनिल सावंत याने तिथे जवळच पडलेला लोखंडी गज हातात घेवुन फिर्यादी किरण अजिनाथ शिंदे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा करे करीत आहे.