डाॅ.अरविंद आरकिले यांच्या रूग्णालयात पुन्हा चोरीचा प्रकार - इंदापूर शहरात वारंवार घडताहेत चोरीच्या घटना

डाॅ.अरविंद आरकिले यांच्या रूग्णालयात पुन्हा चोरीचा प्रकार - इंदापूर शहरात वारंवार घडताहेत चोरीच्या घटना

इंदापूर || इंदापूर शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी  घडलेल्या चोरीच्या घटना ताज्या असतानाच शिवाजी नगर परिसरात इंदापूर अकलूज रोडवरील डाॅ.अरविंद आरकिले यांच्या घरी सलग दुसऱ्यांदा चोरी चा प्रकार घडला आहे.मंगळवारी दि.31 रोजी मध्यरात्री ते बुधवारी दि.01 रोजी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.मात्र या चोरीत अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाचे नुकसान केले असून इतर कोणतेही साहित्य व रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागलेली नाही.

डाॅ.अरविंद आरकिले यांनी मंगळवारी दि.31रोजी महालसीकरण शिबीरात कर्तव्य बजावून रात्री उशिरा ते निमगांव केतकी ग्रामीण रुग्णालतून इंदापूर शिवाजी नगर परिसरातील आपल्या निवासस्थानी आले. त्यावेळी त्यांना परिसरातील वीज बंद अवस्थेत दिसली. त्यानंतर आरकिले यांनी स्वतः वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर ते घरात झोपी गेले.

सकाळी उठून पाहिले असता त्यांना त्याच्या रुग्णालयातील तपासणी रुम मधील एक खिडकी उघडी व काही साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत दिसून आले. त्यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता,त्याच्या MH 45 N 5367 या चारचाकी वाहणाची पुढील बाजूची डाव्या खिडकीची काच अज्ञातांनी फोडल्याचे दिसून आले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता गाडी मधील काही साहित्य ही अस्ताव्यस्त स्थितीत दिसून आले. यानंतर शेजारी उभा केलेल्या दुचाकीचा पेट्रोल पाईप कापून त्यामधील इंधन अज्ञातांनी लंपास केल्याचे आरकिले यांच्या निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा आपल्या घरी अज्ञात चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केला असल्याची त्यांची खात्री पटली.

मागील घटनेमध्ये इंदापूर शहरात फेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात एकाच रात्रीत घडलेल्या विविध ठिकाणच्या चोरीच्य घटनेत डॉक्टर आरकिले यांच्या रुग्णालयातून ही मध्यरात्री साडेबारा हजार रुपये रोख रक्कम व पाच हजार रूपये किमतीचे इतर साहित्य चोरीस गेले होते.यानंतर इंदापूर आरकिले यांनी इंदापूर पोलिसात यांची कल्पना दिली होती. या घटनेस सहा महिने ओलांडतात ना तोच पुन्हा एकदा डाॅ.आरकिले यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे.झालेल्या घटनेबद्दल वृत्त लिहीपर्यंत  इंदापूर पोलीसांत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशा घटना वारंवार घडत असल्याने मी इंदापूर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुध्द कायदेशीर तक्रार नोंदवणार असल्याचे डाॅ.अरविंद आरकिले यांनी सांगितले.