मोहोळ तालुक्यातील २५ वर्षापासून रखडलेल्या वितरिका कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी 

मोहोळ तालुक्यातील २५ वर्षापासून रखडलेल्या वितरिका कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी 

मोहोळ दि.23 // मोहोळ तालुक्यातील गेल्या पंचविस वर्षापासून रखडलेला उजनी डावा कालव्यावरील लांबोटी ते भोयरे पर्यंत च्या वितरीकेच्या कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार(दि.२३) आमदार यशवंत माने व जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले कि,मोहोळ विधानसभा मतदार संघातील उजनी डावा कालव्यावरील लांबोटी ते भोयरे पर्यंत च्या वितरीकेच्या कालवा स्वछतेचे काम मागील २५ वर्षापासून रखडले होते.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विशेष सहकार्यातुन आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न मार्गी लागला असून यामुळे आष्टे,भांबेवाडी,हिंगणी, निपाणी,भोयारे या गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.यापूर्वी कालव्यावरील १ ते १७ किलोमीटर पर्यंत फक्त हजार हेक्टर ओलीताखाली येत होते. परंतु कालव्यावरील १७ ते ३२ किलोमीटर पर्यंत ची दुरवस्था झाल्याने पाणी पोहचत नसल्याने शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.परंतु सध्या कालव्याची दुरुस्ती होऊन दोन हजार ते अडीच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.

रखडलेल्या कालव्याच्या दुरूस्तीचा कामाचा शुभारंभ होऊन काम मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांचे आभार मानले. यावेळी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.