इंदापूरात आज कोरोना बाधितांची संख्या पावणे तीनशेच्या घरात ; तर 143 रुग्णांची कोरोनावर मात

इंदापूरात आज कोरोना बाधितांची संख्या पावणे तीनशेच्या घरात ; तर 143 रुग्णांची कोरोनावर मात

इंदापूर || इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. आज मंगळवारी तर तालुक्यात कोरोनाचा बाँम्ब फुटल्याची स्थिती आहे. आज तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी ग्रामीण भागातील 221 तर शहरातील 51असे एकूण 272 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने आज कोरोना बाधितांची संख्या जवळपास पावणे तीनशेच्या घरात गेली आहे.

आजपर्यंत इंदापूर तालुक्यात 8 हजार 997 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यापैकी 7 हजार 144 रुग्णांनी कोरोनावर मात केली.आज मंगळवारी देखील 143 व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळवला. असे असले तरी आतापर्यंत 190 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.यात ग्रामीण भागातील 156 तर शहरातील 34 रुग्णांचा समावेश आहे.

यापैकी आज मंगळवारी चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.सध्य स्थितीला इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागारील 1390 व शहरातील 273 असे एकूण 1663 व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.

इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत 30 एप्रिल पर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारने जे निर्बंध घालून दिले आहेत.जी नियमावली घालून दिली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे.अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा असे आवाहन तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले आहे.