नापास कट्टा बेवसिरीजचा पहिला एपिसोड आज प्रेक्षकांच्या भेटीला ;  असा आहे आजपर्यंतचा प्रवास

नापास कट्टा बेवसिरीजचा पहिला एपिसोड आज प्रेक्षकांच्या भेटीला ;  असा आहे आजपर्यंतचा प्रवास

इंदापूर दि.07 // नापास कट्टा हि वेबसिरीज परीक्षेत नापास झालेल्या मुलांच्या जिवनावर आधारीत बनवली असून या वेबसिरीजचा पहिला एपिसोड आज शनिवार दि.07 नोव्हेंबर रोजी Priyatama Production या यु ट्युब सोशल मिडियावर सकाळी 08 वाजून 30 मिनीटांनी प्रकाशित केला जाणार आहे.या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही सामाजीक संदेश देत आदर्श समाज घडवण्या प्रयत्न करणार असल्याचे दिग्दर्शक अतुल भालेराव यांनी सांगितले.

ते म्हणाले कि परीक्षेत नापास झालेल्या मुलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन थोडा वाईट असतो तो बदलण्यासाठी नापास कट्टा हि वेबसिरीज सुरु करण्याची गरज वाटली.यासाठी गेले 13 महिने झाले हि संकल्पना आम्ही सतत्या ऊतरवण्याच प्रयत्न करीत आहोत. त्याला आत्ता यश आले आहे.यातून आम्ही ग्रामीण भागातील कलाकार आणि ग्रामीण जनजिवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामिण भागातील मुलांना वाव मिळण्याकरिता ग्रामीण भागातील मुलांचे ऑडीशन घेऊन याची सुरुवात झाली. 


पहिला एपीसोड हा नापास झालेल्या मुलांचे जे मनाचे खच्ची करण होते आणि त्यानंतर ते विचलित होऊन आत्महत्त्या करण्याचा निर्णय घेतात त्यावर पालकांचे असणारे भाष्य यावर आधारित आहे.हि वेबसिरीज दिग्दर्शक-अतुल भालेराव, निर्माता-चंद्रकांत लांडगे,कथा-पटकथा व संवाद-समीर पठाण आदींच्या प्रयत्नातून साक्षातकारात उतरली आहे. तर अमोल वाघ, सागर कांबळे,प्रशांत मखरे,सुप्रीया खाडे,कुमार शिंदे,राहुल बिबे,किरण उघडे,रोहित शिंदे,अशितोश माने,प्राजक्त लोलगे,ज्योती अंधारे ,पद्मजा खटावकर,जगन्नाथ घाडगे,मारुती वाघ,सचीन चव्हाण ,उत्तम लांडगे,अमोल लांडगे व बबलु भोसले आदी कलाकार यात काम करणार आहेत. 

आपल्या ग्रामीण भागातील मुलांना पुढे जाण्यासाठी डासळलेल्या मनस्थितीत त्यांना आधाराची गरज आहे.यासाठी त्यांना पाठबळ देण्याची गरज असून या वेबसिजरीज मधील कलाकारांची कला जास्ती जास्त लोकान पर्यंत पोचवा एपीसोडची लिंक सगळेकडे शेअर करा असे आव्हान त्यांनी प्रेक्षकांना केले आहे.