मुख्यमंत्री कोणालाही सोडत नाहीत ; पोहरादेवी गर्दीसंदर्भात कारवाई होईल - संजय राउत

मुख्यमंत्री कोणालाही सोडत नाहीत ; पोहरादेवी गर्दीसंदर्भात कारवाई होईल - संजय राउत

मुंबई // कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय कठोर आहे.मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करुन जी गर्दी जमवली या  गर्दीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. बुधवारी मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, की पोहरादेवी येथे नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात हे अवघा महाराष्ट्र जाणतो,ते आपल्या जवळच्या कोणालाही  सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यामुळे या प्रकरणात सुध्दा राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.