…अनं जयंत पाटलांच्या त्या सभेने अनेकांना पवार साहेबांच्या साताऱ्याच्या सभेची आठवण झाली.

…अनं जयंत पाटलांच्या त्या सभेने अनेकांना पवार साहेबांच्या साताऱ्याच्या सभेची आठवण झाली.

पंढरपूर || सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभा मैदान गाजवत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.रविवारी (11मार्च) रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. मात्र जयंतरावांच्या या सभेने अनेकांना पवार साहेबांच्या साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटविधानसभा निवडणुक ही घेण्यात आली.2019 साली शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाच्या सरी शरद पवार यांनी आपल्या डोक्यावर छेलत सभेचे मैदान दाणाणून सोडले होते. शरद पवार यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीतील ही सभा ऐतिहासीक ठरली. त्यांच्या याच सभेमुळे अनेकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या विधानसभेत मोठी कामगिरी करुन दाखवली होती. 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूक  जिंकण्याचा विढाच उचललाय की काय असे चित्र सध्या पहायला मिळाले. उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे सभेत भाषण करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि डोक्यावर पावसाच्या सरी पडत असताना ही जयंता पाटील तसूभरही ही विचलीत झाले नाहीत. त्याच परिस्थितीत त्यांनी सभेत उभं राहत आपलं भाषण पूर्ण करत मैदान गाजवलं.आणि श्रोत्यांना शदर पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.