सणसरचे भूमीपुत्र पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी ; आजी-माजी मंत्र्यांनी केलं भावनिक ट्विट

सणसरचे भूमीपुत्र पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी ; आजी-माजी मंत्र्यांनी केलं भावनिक ट्विट

इंदापूर || आसाम आणि मिझोराम या राज्यांच्या सीमा रेषेवर सोमवारी झालेल्या चकमकीत पाच पोलिस शहीद झाले असून इंदापूर तालुक्यातील सणसर गावचे सुपुत्र आय.पी.एस. वैभव चंद्रकांत निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी जखमी आहेत. ही वार्ता तालुभरात पसरताच संपूर्ण तालुक्यातून ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात येत आहे. 

या घटने संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी  दि.27 रोजी ट्विट करित आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.आसाम मिझोराम सीमेवर झालेल्या चकमकीत इंदापूर सणसर गावचे सुपुत्र आय.पी.एस. वैभव चंद्रकांत निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्याची बातमी वेदनादायी व अस्वस्थ करणारी आहे. त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी कामना व्यक्त करतो. लवकर बरे व्हा ! अस राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. 

तर कछार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर हे मिझोराम-आसाम सीमेवरील गोळीबारात जखमी झाले असून ते यातून लवकरात लवकर बरे होऊन आपल्या कर्तृत्वावर रूजू व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.