बिजवडी परिसरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बिजवडी परिसरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

इंदापूर || बिजवडी परिसरात अठरा वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून सोमनाथ गोरख साबळे वय 18 असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत मयताचे वडील गोरख लक्ष्मण साबळे वय 45 रा.पाटसरागाव ता.आष्टी जि.बीड सध्या रा.बिजवडी कारखाना ता.इंदापुर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबरी जबाब दिला आहे.

साबळे हे गेल्या तीन वर्षापासून बिजवडी कारखाना या परिसरात रहायला असून ते ऊसतोड करुन उदरनिर्वाह चालवतात.मयत सोमनाथ गोरख साबळे हा देखील कुटुंबातसमेत राहतो.दि.22 जून रोजी सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान घरातुन कोणास काही न सांगता निघून गेला. कुटुंबीयांनी त्याची रात्रीपर्यंत वाट पाहीली, तो घरी न परतल्याने आजुबाजुच्या परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. 

बुधवारी दि.23 रोजी सकाळी 6 वाजता चे दरम्यान याच परिसरात राहणाऱ्या सतुबाई यांच्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळून आला.त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने खाली उतरुन त्यास उपजिल्हा रुग्णालय इंदापुर येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासनी अंती तो मयत झालेचे घोषित केले.पुढील तपास पोलिस हवालदार अरुण रासकर करित आहेत.