कर्मयोगी साखर कारखान्याचा 31 वर्षाचा प्रवास यशस्वी ; ९ लाख 30 हजार मेट्रिक टन गाळपाने सांगता

कर्मयोगी साखर कारखान्याचा 31 वर्षाचा प्रवास यशस्वी ;  ९  लाख 30 हजार मेट्रिक टन गाळपाने सांगता

इंदापूर 08 // सहकारातील कारखानदारीत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर   कारखान्याने 31 वर्षाचा प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले पण ही संस्था  कधीही डगमगली नाही. उस उत्पादक , सभासद ,संचालक, कामगार ,यांच्या मेहनतीच्या जीवावर हा प्रवास यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार राज्याचे माजी सहकार मंत्री कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले..

सोमवारी ८ मार्च रोजी इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०,२१ च्या   ३१  व्या यशस्वी गळीत हंगामाची सांगता  पाटील गव्हान  पूजन करून  करण्यात आली.कारखान्याने १४१  दिवसात चांगले नियोजन करून ९  लाख ३०  हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उत्कृष्टरित्या हंगाम पार पाडल्याबद्दल पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.

यावेळी पाटील म्हणाले की, या हंगामात नऊ लाख 30 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून 9 लाख 11 हजार 150 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे .साखर उतारा सरासरी 10. 96%  झालेला असून आसावणी  प्रकल्पातून ५३ लाख १०  हजार १६० लिटरचे उत्पादन झाले असून  सहवीज निर्मिती प्रकल्पातून १  कोटी ५३  लाख ३३  हजार ६००  युनिटची  उत्पादन  करण्यात आले आहे.कंपोस्ट खताची विक्री २४५७ मेट्रिक टन करण्यात आली आहे. तर सेंद्रिय खताच्या ७ हजार  पिशव्यांपैकी ६४५३ पिशव्यांची विक्री झाली आहे तर   २०  हजार पिशव्या प्रोसेसमध्ये आहेत. ६,८३५ लिटर्स जैविक खत विक्री,५२, १७४ घनमीटर बायोगैस उत्पादन केले आहे तसेच प्रेसमड उत्पादन १,९३७ मे. ट्रन व मोलॉसेस उत्पादन हे २७,५०० सी. हेवी व  १९,१५० बी. हेवी मेट्रिक टन घेतले आहे. माती व पाण्याचे ११९ नमुने तपासणी करण्यात आल्या आहेत.

कर्मयोगी कारखान्याने राज्यात पहिला प्रयोग हा ऊसतोडणी मजुरांसाठी  थेट शेतकऱ्यांच्या  फडात  जावून जवळपास ७ हजार ४०० मजुरांची मोफत तपासणी केली आहे. यासाठी   शंकरराव पाटील चैरिटेबल ट्रस्ट  व कारखान्याचे शेतकी विभागाच्या सर्व घटकांचे पाटील यांनी कौतुक  करत  आभार मानले.सध्या सहकारी कारखानदारीस खासगी कारखान्यांशी स्पर्धा  असून यापुढे सहकारी साखर कारखानदारी ही नियमांच्या चौकटीत बसून सर्वांनी सामूहिक जबाबदारी समजून चालवली  पाहिजे असे पाटील  यांनी  सांगितले. कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी कारखान्याच्या सर्व तांत्रिक बाबींचा आढावा आपल्या भाषणात घेतला व कामगार वर्गाचे कौतुक  केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.यावेळी कारखान्याचे  संचालक भरत शहा, वंसत मोहोळकर , हनुमंत जाधव, सुभाष काळे, यशवंत वाघ,राहुल जाधव, केशव दुर्गे , राजेंद्र चोरमले,  भास्कर गुरगुडे ,मच्छिंद्र अभंग, मानसिंग जगताप,अंबादास शिंगाडे , विष्णु मोरे, अंकुश काळे , राजेंद्र गायकवाड , सुभाष भोसले ,अतुल व्यवहारे , पांडुरंग गलांडे,जयश्री नलवडे  यांच्यासह आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यालयिन अधिक्षक  शरद काळे यांनी केले तर आभार संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी मानले.