विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे - जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे - जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील

इंदापूर || श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा संचालित कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली ता. इंदापूर येथे गुरूवारी दि.09 सप्टेंबर रोजी  जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दहावी व बारावी तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या आणि राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

अंकिता पाटील म्हणाले की,' विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे या क्षेत्रात आपण सर्वोच्च पदापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विविध कौशल्य विकसित करावेत. आई-वडील, शाळा यांचे नाव मोठे करा. समाजाची सेवा करा. कोरोना पार्श्वभूमीमध्ये या शाळेने टीम वर्क च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले त्याचे त्यांनी कौतुक केले.

 स्पर्धा परीक्षेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल विशाल तुपे यांचा अंकिता पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अनुजा थोरात, राजेश सकट यांनी यावेळी मनोगत व्यक्त  केले.यावेळी माजी सरपंच बापूराव पांढरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश घोरपडे,शिक्षक आघाडीचे संतोष कदम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार, बाळासाहेब मोरे यांनी केले. आभार शिवाजी मोरे यांनी मानले.