निर्बंध अधिक कडक करताय तर वीज कापणी थांबवा ; देवेंद्र फडणवीसांची मागणी

निर्बंध अधिक कडक करताय तर वीज कापणी थांबवा ;  देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई || राज्य सरकारने राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात वीकेण्ड लॉकडाऊन ची घोषणा केली. शिवाय लावण्यात आलेले निर्बंध ही कडक केले आहेत. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्बंधांना व वीकेण्ड लॉकडाऊनला सहकार्य करणार असल्याची घोषणा केली आहे. 

मात्र विरोधी पक्ष एवढ्यावरचं थांबला नाही तर विरोधी पक्षाने राज्य सरकारकडे काही मागण्यादेखील केल्या आहेत. राज्य सरकारने सक्ती करून 5000 कोटींची वीजबिलांची वसुली केली. आता तरी ही वीजजोडणी तोडणे बंद करून ही वसुली थांबविली पाहिजे. मजूर, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, छोटे व्यवसायी यांना मदत करण्यासाठी पॅकेजची घोषणा तत्काळ करावी. अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोरोनाच्या विषयावर आम्ही कधी राजकारण केले नाही. पण आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर टीका करणे थांबवा असे फडणवीस यांनी सुनावले आहे.