पंढरपूरात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - चंद्रकांत पाटील आमने-सामने ; पालकमंत्री दत्तात्रय भरणेही राहणार उपस्थित

पंढरपूरात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - चंद्रकांत पाटील आमने-सामने ; पालकमंत्री दत्तात्रय भरणेही राहणार उपस्थित

पंढरपूर || पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोट निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मंगळवार(दि.30) हा शेवटचा दिवस आहे.सध्या ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असून ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने ताकद लावली आहे.दोन्ही पक्षाकडून तोडीस तोड उमेदवार देण्यात आले असून पंढरपूरमध्ये आज सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार आहेत.

राष्ट्रवादी च्या वतीने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यांचा उमेदवारी अर्ज आज मंगळवारी (दि.30) रोजी  दाखल केला जाणार आहे.या उमेदवारी अर्जासाठी राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे दोघेही आज पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून, या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवेढ्याचे उद्योजक समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून स्वर्गीय भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आज मंगळवारी(दि.30) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी  जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे 11 वाजता अर्ज भरण्यासाठी पंढरपूर मध्ये उपस्थित राहणार आहेत. 

साहेबांनी आज उमेदवार नव्हे, तर "विजेता" घोषित केला आहे - पालकमंत्री दत्तात्रय भरणे 

राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोटनिवडूकीसाठी नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स होता. मात्र सोमवारी(दि.29)रोजी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. यानंतर मंत्री जयंत पाटील,खासदार अमोल कोल्हे यांसह अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पवार साहेबांनी आज उमेदवार नव्हे, तर "विजेता" घोषित केला आहे अशा शब्दात भगीरथ भालके यांच्या उपनेदवारी बद्दल विश्वास व्यक्त केला.स्वर्गीय भारत नानांवर ज्यांनी अमाप प्रेम केलं त्या मायबाप जनतेचे आशीर्वाद व विठू माऊलींची कृपा भगीरथ भारतनाना भालकेंच्या पाठीशी आहेत. गुलाल उधळायला तयार राहा, आपला विजय निश्चित आहे. अशा शब्दात राज्यमंत्री भरणे यांनी मदतदारांना आवाहन करीत विश्वास व्यक्त केला आहे.