राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून इंदापूरच्या नवदुर्गांचा विशेष सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून इंदापूरच्या नवदुर्गांचा विशेष सन्मान

इंदापूर || खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरूवारी दि.14 रोजी नवरात्री उत्सवानिमित्ताने "महाराष्ट्रातील नवदुर्गा " म्हणून महिला पोलिस अधिकारी , बँकेच्या महिला अधिकारी, शेती, सहकार विभागाच्या महिला अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या विविध महिलांच्या कामाच्या ठिकाणी जावून या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान पत्र देऊन गौरव केला.यावेळी इंदापूर तालुका महिला तालुकाध्यक्षा श्रीमती. छाया पडसळकर, शहराध्यक्षा उमा इंगोले, युवती अध्यक्षा अश्विनी राऊत-कुर्डे, कार्याध्यक्षा स्मिता पवार, उपाध्यक्षा उज्वला चौगुले यांसह इतर सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.