महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान - जिल्हाध्यक्ष स्वाती आरडे

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान - जिल्हाध्यक्ष स्वाती आरडे

इंदापूर || लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर येथे मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष स्वाती आरडे यांनी अभिवादन केले.

या वेळी बोलताना स्वाती आरडे म्हणाल्या की अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

या वेळी महिला तालुका अध्यक्ष रेखाताई खिलारे उपाध्यक्ष लक्ष्मी मोहिते मार्गदर्शक राहुल आरडे यावेळी उपस्थित होते.