धक्कादायक : ट्रॅक्टरच्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू

धक्कादायक : ट्रॅक्टरच्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू

पुणे || जुन्नर तालुक्यातील राळेगण गावात ट्रॅक्टरच्या अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला तर, चालक जखमी झाल्याची घटना घडली.  कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोपान उंडे काही दिवसाची सुट्टी काढून आपल्या कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी आले होते. पाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आणि शनिवारी या ट्रॅक्टरचा अपघात झाला.त्यात ही भयानक घटना घडली.

शनिवार रोजी दुपारच्या दरम्यान सोपान उंडे हे त्यांचा मुलगा तेजस व घंगाळदरे येथील चालक संदेश तळपे यांना घेवून शेतीच्या मशागतीची कामे करत होते.ट्रॅक्टर घेऊन  शेतात जात असताना तीव्र उभा चढ आणि जागेवरचं वळण असल्याने चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला.त्यामुळे ट्रॅक्टर वीस फूट खोल असलेल्या दुसऱ्या शेतात जाऊन पडला. दरम्यान एक पलटी मारून ट्रॅक्टर पुन्हा उभाही राहिला. 

यादरम्यान सोपान उंडे व चालक ट्रॅक्टरमध्ये अडकले तर मुलगा तेजस जमिनीवर पडला. यात उंडे पिता-पुत्राचा मृत्यू झाला. पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत.