धक्कादायक || उजनी जलाशयात बोट उलटल्याने पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

धक्कादायक || उजनी जलाशयात बोट उलटल्याने पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

करमाळा 01 (शितलकुमार मोटे)// उजनी जलाशयात बोटीत सेल्फी काढताना बोट उलटल्याने अकलूज येथील पिता-पुत्राचा वांगी-३ (ता.करमाळा) परिसरातील जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विकास गोपाळ शेंडगे (वय ३९) व मुलगा जय विकास शेंडगे (वय १३) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.तर मयत विकास शेंडगे यांच्या पत्नी पत्नी, मुलगी यांसह दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,की अकलूज येथील विकास गोपाळ शेंडगे (वय ३९), स्वाती विकास शेंडगे (वय ३०), जय विकास शेंडगे (वय १३), अंजली विकास शेंडगे (वय-९) हे सर्व करमाळा तालुक्यातील केम येथे नातेवाईकाकडे लग्न कार्यासाठी आले होते.त्यानंतर ते सर्व वांगी नं-३ येथे मित्र जयवंत सातव यांच्याकडे गेले.शेंडगे कुटुंबीयांना बोटीतून फिरण्याची इच्छा झाल्याने ते उजनी जलाशयात मासेमारीसाठी असलेल्या बोटीतून दुपारी पावणे तीन वाजता सातव यांच्या बरोबर फिरण्यासाठी गेले.बोट खोल पाण्यात गेल्यावर ते सेल्फि काढत असताना बोट पलटल्याने सर्व जण पाण्यात बुडाले. विकास शेंडगे आणि त्यांचा मुलगा जय यांचा बुडून मृत्यू झाला तर विकास शेंडगे यांची पत्नी स्वाती शेंडगे आणि त्यांची मुलगी अंजली शेंडगे, जयवंत सातव व त्यांचा मुलगा यांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांना यश आले.स्वाती शेंडगे व अंजली शेंडगे यांना पुढील उपचारासाठी कुटीर रूग्णालयात दाखल केलेले असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.