धक्कादायक ! पोलिओ डोस म्हणून पाजलं सॅनिटायझर

धक्कादायक ! पोलिओ डोस म्हणून पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ 02 // पोलिओ डोस देण्याऐवजी चिमुकल्यांना सॅनिटायझरचा डोस दिल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. पाच वर्षाखालील 12 चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजण्यात आले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.याबाबत सौ.ए.एम.न्यूज व सौ.ई टी व्ही भारत ने वृत्त दिले आहे.

घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना पोलिओचा डोस म्हणून स‌‌ॅनिटायजर पाजल्याची घटना घडली. या 12 बालकांना यवतमाळच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल केले.