शिवशाहीची ऊसतोड मजूराच्या बैलगाडीला जोरदार धडक , दोन बैलांचा मृत्यू ; छत्रपती कारखाना परिसरातील घटना

शिवशाहीची ऊसतोड मजूराच्या बैलगाडीला जोरदार धडक , दोन बैलांचा मृत्यू ;  छत्रपती कारखाना परिसरातील घटना

इंदापूर 18 // बारामती इंदापूर रस्त्यावर छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर च्या परिसरात ऊसतोड मजूराच्या बैलगाडीला शिवशाही बस ने भरधाव वेगात जोरदार धडक दिल्याने यात दोन बैलांचा मृत्यू झाला. आज पहाटेच्या अंधारात हा अपघात झाला आहे.तर बैलगाडी चालक भगवान रानूजी सोनसाळी  रा.बानकवाडी,ता.शिरुर कासार जि.बीड हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत.

मागील पंधरवापुर्वी देखील बेलवाडी नजीक एका ट्रक ने बैलगाडी जोरदार धडक दिली होती. लवकर ऊसतोडणी करायची म्हणून पहटेच्या वेळी ऊसतोड मजूर हे प्रवास करित असतात. आणि अशा वेळी झोपेच्या तंदरित असणारे चालक गाड्यांवर तुटून पडतात आणि अपघात घडतो.पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजूरांवर यामुळे मोठे संकट ओढावत असते,उपचाराचा खर्च ही त्यांना पेलावत नाही.

आज सकाळी पहाटे पाच वाजता  ऊसतोडणी करिता तीन बैलगाडी बोरी या गावी ऊस तोडणी करिता निघाले होते.दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या शिवशाही बस ने जोरदार धडक दिली. या धडकेतेक बैल पुलावरून खाली पडला तर दुसरा बैल दुसऱ्या बाजूला जावून पडला. दोन्ही ही बैल जागीच मृत्यू पावले असल्याचे सोबतच्या ऊसतोड मजूरांनी सांगितले.

शिवशाही बस ने पहाटे झोपेत बैलगाडीला जोराची धडक दिली आहे. बैलगाडी चालक गंभीर असून त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत. कारखाना प्रशासन ऊसतोड मजूराच्या पाठीमागे उभे असून अपघातग्रस्त मजूराला सर्व ती मदत केली जाईल. पोलीस प्रशासनाला योग्य पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या असून आलीकडील काळात बस चालक बेशिस्त ड्रायव्हिंग करत असल्यामुळे विविध ठिकाणी शिवशाही बस चे अपघात घडत आहेत. बस महामंडळाने याची चौकशी करुन अशा चालकांवर कारवाई करावी.उपमुख्यमंत्री अजित पवार,परिवहन मत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत निवेदन देणार असून बेशिस्त शिवशाही चालकांवर कारवाई करण्यास विनंती करणार आहोत. - अमोल पाटील,व्हाईस चेअरमन छत्रपती सहकारी साखर कारखाना 

शिवशाही बस अति वेगात होती.या अपघातात दोन्ही बैल जागीच मृत्यू पावले असून बैलगाडी चालक गंभीर जखमी झाले आहे.शासनाने योग्य ती कारवाई करुन पिडीतांना न्याय द्यावा.- सुखदेव सानप, मुकादम