इंधन दरवाढीचा इंदापूरात शिवसैनिकांनी नोंदवला निषेध, तहसीलदारांना दिले लेखि निवेदन

इंधन दरवाढीचा इंदापूरात शिवसैनिकांनी नोंदवला निषेध, तहसीलदारांना दिले लेखि निवेदन

इंदापूर दि.14 // सातत्त्याने होत असलेल्या पेट्रोल,डिझल दरवाढीचा इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने दि.12 रोजी जाहिर निषेध नोंदवण्यात आला. तर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.याचसोबत वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दाणवे यांचा देखील शिवसैनिकांनी निषेध नोंदवला आहे.याबाबतचे लेखी निवेदन शिवसैनिकांनी इंदापूर तहसीलदार यांना दिले आहे.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भीमराव भोसले,तालुकाप्रमुख नितीन शिंदे,संदीप चौधरी,शहरप्रमुख महादेव सोमवंशी,अरुण पवार,दुर्वास शेवाळे,संजय खंडागळे,बंडी शेवाळे,राजू शेवाळे, यांसह तर शिवसैनिक उपस्थित होते.