तरुणाईला सावरण्यासाठी शंकराराव पाटील चँरिटेबल ट्रस्ट ने घेतला पुढाकार ; आखली शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण योजना

तरुणाईला सावरण्यासाठी शंकराराव पाटील चँरिटेबल ट्रस्ट ने घेतला पुढाकार ; आखली शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण योजना

इंदापूर || कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन मुळे  अनेकांच्या हाताचे रोजगार पळाले आहेत.तर अनेकांची शिक्षणाची दारे बंद झाली.शिकण्याची इच्छा असूनही काहींच्या पदरी निराशा पडली.या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने शंकराराव पाटील चँरिटेबल ट्रस्ट ने पुढाकार घेतला आहे.

संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली "शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण" या महत्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ लागली.शिकण्याची इच्छा आहे पण पैसे नाहीत असे विद्यार्थ्यांची पत्रे येऊ लागली.त्याचा सकारात्मक विचार करुन संस्थेने ही योजना सरु केली आहे.

या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षा पद्मा भोसले म्हणाल्या की,या योजने अंतर्गत ज्यांचे आई किंवा वडील हयात नाहीत किंवा आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे किंवा व्यवसाय बंद पडला आहे अश्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने स्किल्स कोर्सेस साठी मदत करण्यात येत आहे.लाॅकडाऊन मुळे ज्यांच्या पालकांची नोकरी गेली आहे अशा 30 हुन अधिक पाल्ल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

यामध्ये विद्यार्थ्यांना गारमेंट मेकिंग, ब्युटी पार्लर, मेकअप, MS-CIT, BFSI, Tally  या प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण देणे चालू आहे. जेणे करून सदरील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. या सोबतच या तरुणाईला गारमेंट मेकिंग कोर्स, ब्युटी मेकअप आणि हेअरस्टाईल या प्रकारच्या स्किल्स कोर्सेस चे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा संस्थेचा मानस आहे. 

या प्रशिक्षणाच्या जोरावर हि तरुणाई चांगल्या प्रकारची नोकरी करू शकेल किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकेल असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांनी व्यक्त केला आहे.याशिवाय आम्ही सुरु केलेल्या SPCT GAJAB प्लेसमेंट पोर्टलच्या माध्यमातून हि विद्यार्थ्यांना काम उपलब्ध करून देणार आहोत असे ही त्या म्हणाल्या.