वडापूरी हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी

वडापूरी हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी

इंदापूर || एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. ओंकार आगतराव पेंडवळे रा.अवसरी ता.इंदापूर असं आरोपीचे नांव आहे.

पिडीतेच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलिसांत भा.द.वि.क. 376, 506 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4,8,12 नुसार दि.1 आँगस्ट रोजी रात्री 10 वाजताचे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांसमोर हजर केले असता आरोपीस  05 आँगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरील आरोपी हा दि.22 जुलै 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास वडापुरी गावचे हद्दितील फिर्यादीचे घराजवळ आला.तु माझेबरोबर चल असे म्हणुन फिर्यादीस जबरदस्तीने त्याने फिर्यादीचे घराशेजारी असणाऱ्या डाळींबाचे शेतात घेऊन गेला.तिच्यावर अत्याचार केला, झाला प्रकार कोणाला सांगितला तर मी तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद पीडितेने इंदापूर पोलिसात दिली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय धोतरे हे करीत आहेत.