इंदापूरकरांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आता एकचं दिवस पडता येणार बाहेर ! कारण……

इंदापूरकरांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आता एकचं दिवस पडता येणार बाहेर ! कारण……

इंदापूर || राज्यसरकारने कडक संचारबंदी लावून देखील इंदापूर शहर व तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही,तो वाढतचं चालला आहे.मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.याला ब्रेक लागावा म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत शनिवार दि.08 रोजी तात्काळ बैठक बोलावण्यात आली.या बैठकीत बारामती पाठोपाठ आता इंदापूर तालुक्यात ही सात दिवसांचा कड़क लॉकडाऊन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.10 मे सोमवारी मध्यरात्री पासून ते 17 मे पर्यंत कड़क लॉकडाऊन लावणार असल्याचे विभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.लाॅकडाऊन करुन देखील कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यास लाॅकडाऊन पुन्हा सात दिवसांसाठी वाढवला जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

लाॅकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील फक्त मेडिकल व दवाखाने सुरु राहणार आहेत. तर दूध विक्रीसाठी फक्त सकाळी सात ते नऊ अशी वेळ दिली जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.इंदापूरकरांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी फक्त सोमवारीचं घराबाहेर पडता येणार आहे. कारण पुढील एक आठवड्यासाठी अत्यावश्यक सेवेतील मेडिकल सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी  दादासाहेब कांबळे यांनी दिले आहेत.