लोकशाहिरांच्या सन्मानार्थ सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शिष्यवृत्ती जाहिर

लोकशाहिरांच्या सन्मानार्थ सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शिष्यवृत्ती जाहिर

इंदापूर || ग्रामपंचायत सरडेवाडी येथे लोकशाहीर,काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमापूजन सरपंच सिताराम जानकर आणि उपसरपंच हनुमंत जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक रविंद्र सरडे,सतीश चित्राव,गोकुळ कोकरे,सुप्रिया कोळेकर,वैशाली शिद,प्रियंका शिद,वैशाली कोळेकर, गयाबाई तोबरे,अलका कडाळे,ग्रामसेविका स्वाती चव्हाण,दक्षता ढावरे,भारत ढावरे,शिवाजी माने,आदिक दंडेल उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच जानकर म्हणाले की,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाचे योगदान आहे.परदेशात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे पहिले शिवशाहीर आहेत,लोकशाहीरांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने  लोकशाहिरांच्या सन्मानार्थ यावेळी सरडेवाडीतील इ.१०वी मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  शिष्यवृत्ती योजना चालू  करत आहोत.यावेळी इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य रविंद्र सरडे यांनी मनोगत व्यक्त केले,सरडे म्हणाले की,काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी कामगार आणि वंचित शोषितांच्या प्रश्नासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचनीय आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचे स्वरूप,प्रथम तीन हजार रूपये व सन्मानचिन्ह,द्वितीय दोन हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय एक हजार रूपये व सन्मानचिन्ह असे असेल व वितरण १५ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली.आभार अतुल ढावरे यांनी मानले.