कुंभारगाव च्या सरपंचाने बांधले घड्याळ ; गावासाठी २ कोटींचा विकासनिधी देण्याचे राज्यमंत्री भरणे यांचे आश्वासन

कुंभारगाव च्या सरपंचाने बांधले घड्याळ ; गावासाठी २ कोटींचा विकासनिधी देण्याचे राज्यमंत्री भरणे यांचे आश्वासन

इंदापूर || कुंभारगाव (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उज्वला दत्तात्रेय परदेशी यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश करुन स्वगृही परतल्या.

कुंभारगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ७ आहे. गतवर्षी झाल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर सरपंचपदाच्या निवडी झाल्या. निवडीनंतर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपमध्ये सरपंचपदाच्या संख्याबळासाठी रस्सीखेच निर्माण झाली होती.पूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या असलेल्या सरपंच उज्वला परदेशी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सत्कार समारंभाच्या  कार्यक्रमाला  हजर न राहता भाजपच्या कार्यक्रमाला हजर राहिल्यामुळे गावामध्ये चर्चाचा विषय झाला होता. 

शुक्रवारी (ता. ९) रोजी परदेशी यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. यावेळी भरणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच उज्वला परदेशी यांनी गावासाठी विकास निधीची मागणी केल्यानंतर भरणे यांनी २ कोटी रुपयांचा विकासनिधी कुंभारगाव गावासाठी देण्याचे आश्‍वासन दिले. 

यावेळी भरणे यांनी सांगितले की,इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्द आहेत. तालुक्यासाठी जास्तजास्ती विकासनिधी आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, बाळासाहेब करगळ,नवनाथ रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.