…या कारणामुळे संत बाबा राम सिंह यांनी स्वत:ला गोळी झाडून संपवले 

…या कारणामुळे संत बाबा राम सिंह यांनी स्वत:ला गोळी झाडून संपवले 

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशाभरातील शेतकरी आक्रमक झाला असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले 65 वर्षीय संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईट नोटनुसार संत राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरु असलेल्या अत्याचार विरोधात आत्महत्या असल्याचं नमूद केल आहे.

गुलाब सिंह यांनी सांगितले की, मी १९९६ पासून बाबा राम सिंह यांचा शिष्य आहे. बाबाजींचा जन्म पंजाबमधील जगरांव येथे झाला होता. ते सहा बहिणींमधील एकुलते एक भाऊ होते. मी त्यांच्याकडून कीर्तन मिळवले होते. दरम्यान, सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी सध्या बाबांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले जात आहे.

गुलाब सिंह म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाई मनजित सिंह त्यांच्या शेजारी होते. ते बाबांचे राम सिंह यांचे हुजूरी सेवक आहेत. ते प्रत्येकवेळी बाबांसोबत असतात. ८ आणि ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी कर्नालमध्ये अरदास समागम आयोजित केला होता. त्यामध्ये अनेक जत्थे सहभागी झाले होते. ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर बाबाजी तिथे उबदार चादरींचे वाटप करून आले होते. ते दररोज आंदोलनाच्या ठिकाणी जायचे. दररोज डायरी लिहायचे. म्हणायचे की मला हे दु:ख पाहावत नाही.