अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस भिगवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस भिगवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंदापूर || अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करुन तिला धमकी देणाऱ्या नराधमास भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफिने जेरबंद केले.औदुंबर वसंत वेदपाठक रा.आष्टी जि.बीड असे आरोपीचे नांव असून भिगवण पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषण द्वारे बुधवारी पुण्यातून ताब्यात घेत अटक केलेली आहे.त्याच्यावर भिगवण पोलिसांत दि.14 जून 2021 रोजी भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 376,363, 323,504,506 पोस्को 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी औदुंबर वसंत वेदपाठक याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावुन तिला जबरदस्तीने पळवुन नेले.दि.21 मार्च ते 10 जून 2021पर्यंत तिच्यावर वेळोवेळी इंदापूर व हडपसर, ससाणेनगर हिंगणेमळा पुणे येथे बलात्कार केला. जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवुन जर तु कोणास काही सांगितले तर तुझे आईवडिल यांना जिवे मारेन अशी धमकी दिली.तिला मारहाण करण्यात आली. पिडीत मुलगी तिच्या आईला मिळुन आल्यानंतर पिडीत मुलीने हा सर्व प्रकार सांगितला.अशा आशायाची फिर्यादीनुसार भिगवण पोलिसात दि.14 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख  यांचे मार्गदर्शनाखाली,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक  जीवन माने,पोलीस उप निरीक्षक विनायक दडस पाटील,पोलीस अंमलदार भागवत,किरण कदम,महेश उगले,अंकुश माने यांनी केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील हे करीत आहेत.