खुशखबर ! आज पासून पुन्हा एकदा राम-सीता डायग्नोस्टिक सेंटर पुन्हा इंदापूरकरांच्या सेवेत दाखल

खुशखबर ! आज पासून पुन्हा एकदा राम-सीता डायग्नोस्टिक सेंटर पुन्हा इंदापूरकरांच्या सेवेत दाखल

इंदापूर 06 // इंदापूर तालुक्यासह इंदापूर शहरात दि.14 आँक्टोंबर 2020 रोजी जो पावसाचा महाप्रलय पहायला मिळाला त्यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांसह अनेक उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इंदापूर शहरारील एम.एस.ई.बी.शेजारी असणाऱ्या राम-सीता डायग्नोस्टिक सेंटरचे यात सर्वाधिक म्हणजे करोडो रूपयाचे नुकसान झाल्याने गेले चार महिन्याहून अधिक दिवस हे सेंटर पूर्णपणे बंद होते. मात्र मोठ्या संघर्षानंतर ते आज शनिवार दि.06 मार्च पासून पुन्हा इंदापूर करांच्या सेवेत रूजू झाल्याचे डाॅ.बाळासाहेब राऊत यांनी सांगितले आहे.

पावसाच्या महाप्रलयात या सेंटर मधील सर्व अद्यावत मशीनसी जळून खाक झाली. त्यामुळे सी.टी.स्कॅन किंवा तर महत्वाच्या तपासणी करिता इंदापूर च्या रूग्णांना थेट बारामतीचा दौरा करावा लागत होता. मात्र डाॅ.राऊत यांनी संघर्षमय प्रवासातून पुन्हा या सेंटर मध्ये,सिमेंन्स कंपनीची अद्यावत सी.टी.स्कॅन मशीन, अद्यावत डिजिटल एक्सरे मशीन,थ्री.डी - फोर.डी सोनोग्राफी सुविधा,रुदयविकार रुग्णांसाठी टु डी इको तपासणी व ट्रेडमिल तपासणी यासह इतर कोरोना व इतर आजारात आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या तपासण्या करण्यासाठी यंत्रणा उभारली असून या साठी सेंटर सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

अपघात ग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असणारी अद्यावत प्रणाली असणारी सी.टी.स्लॅन मशीन या ठिकाणी बसवण्यात आली असून केवळ २० सेकंदात तपासणी प्रक्रिया या मशीनव्दारे केली जाणार आहे. तर सध्या कोरोनाचा जोर पुन्हा सुरु झाल्यानं या मशीनरीची या उपचार कामी महत्वाची गरज भासत आहे.या सी.टी स्कॅन मशीनव्दारे कोरोना रुग्णाच्या फुफुसात कोरोना विषाणूचा किती प्रमाणात शिरकाव झालेला हे तात्काळ समजते. याच शिवाय फुफुसाचे कॅन्सर,पोटाचे विविध प्रकारचे आजार, गुडघ्याचे व खुब्याचे थ्री.डी सिटी स्कॅन केले जाते. या मशीनद्वारे तपासणी केल्याने रूग्णांना योग्य तो उपचार करण्यास व त्यासोबत रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यास डाॅक्टरांना महत्वाची मदत होते.