5 टी.एम.सी.पाण्याचा रद्द केलेला आदेश पूर्ववत करा माळी सेवा संघाची मागणी ; दिला आंदोलनाचा इशारा

5 टी.एम.सी.पाण्याचा रद्द केलेला आदेश पूर्ववत करा माळी सेवा संघाची मागणी ; दिला आंदोलनाचा इशारा

इंदापूर || इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले पाणी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील माळी सेवा संघाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे.रद्द करण्यात आलेले ५ टी.एम.सी. पाणी इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मंजुर करण्यात यावे.असे लेखी निवेदन माळी सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी दि.04 रोजी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले आहे.

यावेळी माळी सेवा संघाचे राज्य संघटक ज्ञानदेव शिंदे,कायदेशीर सल्लागार अँड.नितीन राजगुरू, तालुकाध्यक्ष बापूसाहेब बोराटे, तालुका महिलाध्यक्ष सौ.वर्षा भोंग, सदस्य अक्षय माळी, बाळासाहेब झगडे, इंदापूर शहर अध्यक्ष सुहास बोराटे,संतोष जाधव आदी उपस्थित होते. 

इंदापूर तालुक्यातील २२ गावासाठी महाराष्ट्र शासनाने ५ टी.एम. सी. पाणी मंजुरीचा आदेश केलेला होता,सदर आदेश मंजूर झालेनंतर काही दिवसांनी तो आदेश रद्द करण्यात आला. मुळत: इंदापूर तालुक्याच्या भूभागात उजनी धरणाचे मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र आहे. आणि सदर उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्यातील अनेक गावे व शेतकरी यांनी योगदान दिलेले आहे. त्यामुळे सदर पाण्यावरती इंदापूर तालुक्यातील जनतेचा नैसर्गीक हक्क आहे. आणि तालुक्यातील २२ गावांचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबीत आहे. सदर २२ गावातील शेतकरी, नागरीक, जनता ही पाण्यापासुन वंचीत राहिलेली आहे आणि या सर्व बाबींचा विचार करून इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या विषयाचा पाठपुरावा करून सदर ५ टी.एम.सी पाणी इंदापूर तालुक्याच्या हक्काने मंजूर करून घेतलेले आहे. माळी सेवा संघाची मागणी मंजूर न झाल्यास माळी सेवा संघ इंदापूर तालुका पदाधिकारी व तालुक्यातील जनतेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा  लेखी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.