राष्ट्रवादी महिला आघाडी इंदापूरने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण संपंन्न ; या गृहिणींनी मारली बाजी 

राष्ट्रवादी महिला आघाडी इंदापूरने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण संपंन्न ; या गृहिणींनी मारली बाजी 

इंदापूर || राष्ट्रवादी महिला आघाडी (इंदापूर शहर) यांच्या वतीने गौरी गणपती उत्सवामध्ये भर टाकण्यासाठी व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ऑनलाईन पध्दतीने  उखाणा स्पर्धा व गौरी सजावट या स्पर्धांचा निकाल शुक्रवारी दि.01 आँक्टोंबर रोजी जाहिर झाला असून या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सौ.भारती शेवाळे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा निरीक्षक सौ.कविता अल्हाट यांच्या खास उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तेथील सभागृहात हा बक्षिस वितरण कार्यक्रम संपंन्न झाला. यावेळी प्रदेश सचिव सौ. कविता आल्हाट, महिला तालुकाध्यक्षा श्रीमती.छाया पडसळकर, शहराध्यक्षा उमा इंगोले, मैत्रिण ग्रुप अध्यक्षा सौ.अनुराधा गारटकर, नगरसेविका सौ.हेमलता मालुंजकर, सौ.राजश्री मखरे,कार्याध्यक्षा सौ. स्मिता पवार, उपाध्यक्षा सौ. करिश्मा शहा, सौ.उज्वला चौगुले, सौ. सुनिता पवार, सौ.रहेना मुलाणी, सौ.अश्विनी कोरडे यांसह इंदापूर तालुक्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

गौरी सजावट या स्पर्धेत सौ. स्नेहा रोडे यांनी प्रथम क्रमांक संपादित केल्या बद्दल इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ.हेमलता मालुंजकर यांच्या तर्फे पैठणी व सौ.मधुरा गवळी नगरसेविका यांकडून आकर्षक सन्मानचिन्हं बक्षिस म्हणून देण्यात आले.तर सौ.वैष्णवी सुर्यवंशी,सौ.दिपा इंगुले,सौ. लक्ष्मी मारकड,सौ. कमल जगताप यांनी व्दितीय क्रमांक मिळवल्या बद्दल शिव कॉस्मेटिक्स व पार्थ कॉस्मेटिक्स यांकडून आकर्षक बक्षिस व सौ.मधुरा गवळी नगरसेविका यांकडून आकर्षक सन्मानचिन्हं देण्यात आले.सौ. मिनाक्षी शिंदे या तृतीय विजेत्यास श्री.बानकर ज्वेलर्स मेन रोड, इंदापूर प्रोप्रा. श्रीनिवास बानकर यांकडून सोन्याची नथ बक्षिस म्हणून देण्यात आली. तर सौ.माधुरी खंडागळे, सौ. सोनाली शेंडे, सौ.भारती इंगुले,सौ.रंजना कोतमिरे व सौ.सिंधू घाडगे या पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून निसर्ग लेडिज शॉपी,इंदापूर यांकडून आकर्षक बक्षिस देण्यात आले.

याचसोबत ऑनलाईन उखाणा स्पर्धेत प्रथम कक्रमांक संपादित केलेल्या सौ. सोनाली सचिन शेंडे यांना इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ.हेमलता मालुंजकर यांच्या तर्फे पैठणी व सौ.मधुरा गवळी नगरसेविका यांकडून आकर्षक सन्मानचिन्हं बक्षिस म्हणून देण्यात आले.तर व्दितीय क्रमांक संपादन केलेल्या सौ.तेजस्वीनी गाढवे, सौ.आकांक्षा शहा,सौ. प्राची चिंचकर यांना शिव कॉस्मेटिक्स व पार्थ कॉस्मेटिक्स यांकडून आकर्षक बक्षिस व सौ.मधुरा गवळी नगरसेविका यांकडून आकर्षक सन्मानचिन्हं देण्यात आले.तृतीय विजेत्या स्पर्धक सौ. सुमेधा दोशी यांना नगरसेविका सौ.राजश्री अशोक मखरे यांकडून आकर्षक पैठणी व सौ.मधुरा गवळी नगरसेविका यांकडून आकर्षक सन्मानचिन्हं बक्षिस म्हणून देण्यात आले.तर सौ. वर्षा संजय पाटील, सौ. संगिता कवितके,सौ. ललिता पाटील, सौ. स्वाती सुरतखाणा यांसह स्नेहा व जयश्री या दोन गृहिणींना निसर्ग लेडिज शॉपी,इंदापूर कडून उत्तेजणार्थ बक्षिस देण्यात आले.