महादेव आवटे व सोहेल सय्यद यांच्या अकाली मृत्यूने तालुका गुणवंत खेळाडूंना मुकला - राजवर्धन पाटील

महादेव आवटे व सोहेल सय्यद यांच्या अकाली मृत्यूने तालुका गुणवंत खेळाडूंना मुकला - राजवर्धन पाटील

इंदापूर // कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बेडगी येथे राज्यस्तरीय कबड्डी सामन्यासाठी जात असताना बुधवारी (दि. 17 रोजी) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघाच्या वाहनाला अपघता झाला.यात दोन खेळाडूंचा अपघाती मृत्यू झाला.तर इतर खेळाडू जखमी झाले.त्यांच्या सध्या उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र नीरा भीमा चे संचालक राजवर्धन पाटील यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या महादेव आवटे व सोहेल सय्यद या दोघांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हे दु:ख सहज पचनारे नाही.मात्र नियतीच्या पुढे कोणालाही जाता आले नाही. आपल्या दु:खात आम्ही सहभागी असून आता हे दु:ख मागे टाकून दोन्ही परिवाराने यातून सावरण्याची गरज असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे.

इस्माईल अली सय्यद यांचा मुलगा पै.स्व.सोहेल इस्माईल सय्यद (वय २२) व बापू बाजीराव आवटे यांचा मुलगा स्व.महादेव बापू आवटे (वय २०) दोघे ही कब्बडीचे महाराणा संघाचे उत्कृष्ट खेळाडू होते.या घटनेमुळे इंदापूर तालुका या दोन गुणवंत खेळाडूंना मुकला आहे.या अपघातात या दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र दुःखाची शोककळा पसरली असून, तरूण मुलांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दु:खातून सय्यद आणि आवटे परिवार बाहेर यावेत, त्यांना परमेश्वराने त्यासाठी शक्ती द्यावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे म्हणून राजवर्धन पाटील यांनी दोघाही खेळाडूंना भावपूर्ण श्रध्दंजली अर्पण केली.