प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल ! बलात्कार होतो तेव्हा तुम्ही काय झोपला होता?

प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल ! बलात्कार होतो तेव्हा तुम्ही काय झोपला होता?

जालना दि.04 //  हाथरच्या घटनेप्रकरणी पंतप्रधान गप्प का असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता. त्यावर बोलताना दरेकरांनी प्रति सवाल उपस्थित करत शिवसेना नेते संजय राऊत यांना धारेवर धरले आहे. 'क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होतो त्यावेळी संजय राऊत झोपले होते का?' असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी विचारला आहे.  दरेकर सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी ते बोलत होते.

रोहयात चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, इकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत. पुण्याला डोंगरात बलात्कार करून मारून टाकण्यात येतं. तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का? राज्यात अराजकता माजलीये त्याच्यावर बोलायला त्यांना वेळ नाही. असा सवाल करत दरेकरांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.हाथरस घटनेचं केवळ राजकारण केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.याचा कर्ता आणि करविता वेगळा आहे म्हणत मुळात राज्यातचं महिला सुरक्षित नसल्याची टीका प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.