व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई || मालाड पूर्वेत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांकडून  दिंडोशी पोलिसांनी तब्बल 13 लाख रुपयांची रोकड आणि एक स्पोर्ट्स बाइक ताब्यात घेतली आहे. मलाड पूर्वेत पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असणाऱ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ उभ्या असलेल्या अ‌ॅक्टिवा गाडीच्या डिक्कीतून २१ लाख रुपये घेऊन दोन्ही आरोपींनी पलायन केले होते. 

एक व्यापाऱ्याने अ‌ॅक्टिवा बाईक टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ उभी केली होती. त्याच वेळी या दोघा आरोपींनी त्या ठिकाणी येऊन व्यापाऱ्याशी हुज्जत घातली. याच दरम्यान त्या व्यापाराच्या गाडीची चावी घेऊन डिक्कीमधून ते 21 लाख रुपये घेऊन त्यांनी धुम ठोकली.  या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे.याबाबत चे वृत्त सौ.ई टी व्ही भारत ने प्रसारित केले आहे.