तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात ; तपकिरी शेटफळ गावातील धक्कादायक प्रकार 

तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात ; तपकिरी शेटफळ गावातील धक्कादायक प्रकार 

पंढरपूर दि.03 // चाॅकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  एका नराधमा विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धक्कादायक घटना तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर)येथे मंगळवारी दुपारी घडली आहे.

या प्रकरणी सुखदेव भोंगे (वय 49) या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे .अल्पवयीन मुलींबाबत  वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे तालुक्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,संशयित आरोपी सुखदेव भोंगे ( वय 49)  हा मंगळवारी दुपारी आपल्या घरी  एकटाच होता.त्याने  बाजूच्या अल्पवयीन  तीन मुलींना चाॅकलेटचे आमिष दाखवून घरी बोलवले. घरात आणि आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून त्याने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा  प्रयत्न केला.

दरम्यान त्यातील एका मुलीने वासनांध झालेल्या नराधमाच्या तावडीतून  आपली सुटका करून घेत  ही  घटना आपल्या घरी  जावून सांगितली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी  नराधमाच्या घराकडे  धाव घेऊन इतर मुलींची मोठ्या शिताफिने  नराधमाच्या तावडीतून   सुटका केली.त्यानंतर  आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

या प्रकरणी  संशयित आरोपी सुखदेव बोंगेच्या  विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने नंतर तालुक्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण  झाला आहे.