पंढरपुर पोलीस पथकाची वाळू माफियांच्या विरोधात मोठी कारवाई; ४५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.

पंढरपुर पोलीस पथकाची वाळू माफियांच्या विरोधात मोठी कारवाई; ४५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.

पंढरपूर दि.4 // सरकोली येथे ट्रक्टर-यारीच्या सहाय्याने भीमा नदीच्या पात्रातून वाळू बाहेर काढून विक्रीसाठी जेसीबीने वाहनांमध्ये भरून पाठवली जात असताना तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये जेसीबी, टिपर व टेम्पो अशी तीन वाहने आणि वाळू असा ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहनांचे चालक व मालक अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी दिली.

पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते मॅडम यांनी  विविध घटकातील अवैद्य धंदे बंद करुन कठोर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्या अनुशंगाने अप्पर पोलीस अधिक्षक झेंडे व पंढरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम  यांचे मार्गदर्षना खाली व पंढरपूर तालूका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे नेतृत्वाखाली पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे हद्दीत अवैद्य धंद्यावरती परिणामकारक कारवाई करण्याचे धाडसत्र सुरूच आहे.अशातच आज सरकोली,टाकळी, भटुंबरे येथून सराईत वाळू चोरी करणाऱ्या टोळीवर धाड टाकून ४५ लाखापेक्षा जास्त किमतीचा मला जप्त करण्यात आला असल्याचे पंढरपूर तालुका पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी सांगितले.या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू चोरांचे धाबे दणाणले असून या धाडसी कारवाई केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.


सरकोली, आंबे, इसबावी आदी ठिकाणच्या नदी पात्रातील वाळू चोरी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वीही अनेकदा कारवाई झाली. मात्र, वाळूचोरी थांबली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सर्वच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.२) पहाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, हवालदार नलवडे, शिंदे, पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांच्या पथकाने सरकोली येथील खटकाळ वस्ती येथे छापा टाकला.

त्यावेळी जेसीबीच्या (क्र.एम.एच. ११/ बी. ए. ५३४६ ) सहाय्याने टिपर (एम.एच. १०/ ए.डब्ल्यू. ७८४१ ) व बिगर नंबरचा ४०७ टेम्पो या वाहनांमध्ये वाळू भरली जात असल्याचे दिसून आले. तात्काळ ही वाहने आणि चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. टिपर चालक नवनाथ सुरेश भोसले (वय २६, रा.सरकोली) याने टिपर मालकाचे नाव सुधीर ऊर्फ छोटू सागर माने (रा.सरकोली) असे असल्याचे आणि वाळू काढलेले शेतही त्याचेच असून जीवन दत्तात्रय भोसले (रा.सरकोली) याने ट्रॅक्टर यारीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू काढल्याचे सांगितले.जेसीबी चालकाचे नांव सुरज अर्जुन म्हमाणे (वय २७, रा.शंकरगाव) असून मालकाचे नाव नितीन धोंडीराम भोसले (रा. सरकोली) आहे. तसेच टेम्पो चालकाचे नाव सचिन तुकाराम भोई (वय २७, रा.सरकोली) असून सदर टेम्पो कल्याण भोसले व सोमनाथ भालके (रा.सरकोली) या दोघांचा भागिदारी मध्ये असल्याचे स्पष्ट झाले.

कारवाई चालू असताना एक चारचाकी थोड्या अंतरावर नदीकाठी उभी होती. पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवताच ती भरधाव वेगाने निघून गेली. सदरचे वाहन हे स्कोडा कंपनीची कार (क्र.एम.एच. १० /ए.एन. ४८४८) असून ती सुधीर ऊर्फ छोटू माने याची असल्याची माहिती मिळाली आहे, असे पोलीस निरीक्षक अवचर यांनी सांगितले.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे करीत आहेत.